निलेश कोकणे माण तालुका प्रतिनिधी (सातारा)
माण खटाव मतदार संघांचे जलनायक पाणीदार आमदार श्री जयकुमार गोरे ( भाऊ ) यांना आज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ग्रामीण विकास आणि पंचायत राज खाते देण्यात आले.माण खटाव च्या इतिहासात प्रथम हा बहुमान या मातीला भाऊंच्या रूपाने मिळाला आहे. गेली पंधरा वर्ष केलेले अथक प्रयत्न. जनतेची केलेली मनःपूर्वक सेवा. पाण्यासाठी केलेला संघर्ष. विकासाचे तयार केलेले विकासाचे एक नवीन पर्व. माण खटावच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक पुसण्याचे केलेले निस्वार्थी मनाने काम. हेच जनतेने डोळ्याने पाहिलेला माण खटाव चा सर्वांगीण विकास पाहून कोणताही अमिषाला बळी न पडता जनतेने भाऊंना बहुमतांनी निवडून दिले. आणि एक माण खटाव च्या मतदार संघात इतिहास घडवीला. याची दखल भारतीय जनता पार्टीने घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माण खटाव च्या जनतेला दिलेला शब्द करून दाखविला आणि भाऊंना महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज या अतिशय महत्वाच्या खात्याची जवाबदारी श्री जयकुमार गोरे भाऊंना दिली.भाऊंनी केलेला माण खटाव चा विकास संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पहिला आहे. दुष्काळी भागाचे नंदनवन कसे करायचे ते या भाऊंच्या कार्यातून लक्षात येते. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण म्हणून खुद मुख्यमंत्री यांनी भाऊंचा उल्लेख राज्याच्या अनेक सभामध्ये केला आहे. भाऊंच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना योग्य खाते देऊन माण खटावच्या मातीचा सन्मान संपूर्ण राज्यात केला आहे. संपूर्ण माण खटावची जनता आनंद व्यक्त करताना दिसत आहे.


