प्रतिनीधी: – कैलासराजे घरत (खारपाडा पेणं)
कु.क्रिश चिंतामण डंगर हा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दूरशेत या शाळेचा इयत्ता ५ वी मधील विद्यार्थी असून सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात रायगड गणित अध्यापक महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या संबोध परीक्षेत १०० पैकी ९२ गुण मिळवून जिल्ह्यात तिसरा आला. कु.क्रिश चिंतामण डंगर याची घरची आर्थिक परिस्थिती गरीब असून प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी सचिन गावंड सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मेहनतीनं अभ्यास करून हे दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. सचिन गावंड सर आपली नोकरी सांभाळून मे महिन्याची सुट्टीत व गणपती सुट्टीत एक आठवडा तसेच प्रत्येक रविवारी १ मे २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मोफत क्लास घेत होते. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे क्रिशने चीज करून दाखविले. योग्य मार्गदर्शन आणि प्रामाणिकपणे अभ्यास केला तर यश निच्छित प्राप्त होते. परिस्थिती कधीही यशाच्या आड येत नाही हे क्रिशला मिळालेल्या यशाने सिध्द केले आहे. क्रिशला मिळालेल्या यशात त्यांचे मार्गदर्शक, शिक्षणप्रेमी श्री.सचिन गावंड सर यांचे मोलाचे योगदान आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन किसन गावंड यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य अतिशय वाखाणण्याजोगे आहे. सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवित असतात. नेत्र तपासणी शिबिर, विद्यार्थी मार्गदर्शन, गडसंवर्धन मार्गदर्शन, सूर्य नमस्कार,योगा वर्ग असे अनेक उपक्रम राबवित असतात. कु.क्रिश डंगर याला मिळालेल्या यशाबद्दल ग्रामस्थ मंडळ दूरशेत यांनी अभिनंदन केले. त्याचे सर्वच स्थरातून अभिनंदनास शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



