वर्धा विभाग प्रतिनिधी: – इम्रान खान
वर्धा : जिल्ह्यातून हद्दपार असतानाही शहरासह परिसरात खुलेआम वावरत असलेल्या हद्दपार गावगुंडास रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.अतुल अंकुश निमसडे (२४ रा. हनुमान गढ पिपरी मेघे) हा कलम ५५ नुसार एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. असे असतानाही तो न्यायालयाची परवानगी न घेत आदेशाचे उल्लंघन करुन परिसरात वावरत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी जात त्यास अटक करुन रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.


