अकोला विभाग प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत लाडेगाव उमरा मार्गावर १९ डिसेंबर रोजी ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून लाडेगाव उमरा मार्गावर एका दुचाकी चालकाच्या ताब्यातून अवैध गुटका जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. 543/24 नुसार विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या ताब्यातून अंदाजे 14940 रुपयाचा अवैध गुटखा मुद्देमाल व दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.


