बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी :-सुनिल वर्मा लोणार -तालुक्यातील सुलतानपूर येथे दिनांक 17 डिसेंबरच्या आत मध्यरात्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अज्ञात व्यक्तीने उभारण्यात आला याबाबत ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी गजानन कावरखे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुलतानपूर येथे दिनांक 17 डिसेंबरच्या मध्यरात्री बस स्टॅन्ड वर नव्याने सुरू असलेल्या तलाठी , मंडळ अधिकारी कार्यालय कार्यालयासमोर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला सदर घटना दिनांक 18 डिसेंबरच्या सकाळी उघडकीस आल्याने सकाळी सर्व नागरिकांनी पुतळ्याकडे धाव घेतली.

सदर घटनेची माहिती बिटजमदार लक्ष्मण कटक यांनी ग्रामपंचात अधिकारी यांना सांगितली त्यावरून यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 329 (३), व भारतीय न्यायासंहित कलम 11 पुतळ्याची पवित्र भंग प्रतिबंध कारवाई करण्यात आली.सदर घटनेमुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवलेला आहे


