पुसद तालूका प्रतिनिधी :- सिद्धार्थ कदम
पुसद :- दि १६ डिंसेबर रोजी महाराष्ट्र बंद च्या समनार्थ पुसद येथे कडकडीत बंद पाळण्यात आला परभणी येथील घटनेचा जाहिर निषेध नोंदविण्यात आला तसेच संविधान प्रेमी सोमनाथ सुर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ शहीद झाला होता या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी व संविधान प्रेमी जनतेने रस्तावर उतरून घटनेचा एक निषेध मोर्चा काढून पुसद मध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता या बंदच्या माध्यमातून परभणी येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निविदेन देण्यात आले या निवेदनामध्ये परभणी घटनेतील पोलीसांच्या कोबिंग ऑपरेशनची एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी या मागणीसह कलम 176 (A) सीआरपीसी अन्वये या प्रकरणाची सखोल चौकशी करावी ही चौकशी सेवानिवृत्त न्यायाधिश न करता सिटींग न्यायाधिशा मार्फत करावी अश्या विविध मागण्या करण्यात आल्या..


