पैशाच्या कारणावरून वाद होऊन मित्रालाच मारहाण केल्याची घटना वाडेगाव येथे घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. नितेश एकनाथ मानकर (३२, रा. वाडेगाव, ता. बाळापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उधार घेतलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून गणेश सुखदेव राहुळकर (३४), गजानन सुखदेव राहुळकर (३९), गजानन ऊर्फ बाबळू ओंकार राहुळकर (सर्व रा. वाडेगाव) यांनी त्यांना लोखंडी पाईप किंवा हातोड्याने डोक्यावर व छातीवर मारून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला.


