अकोला जिल्हा प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
वैयक्तिक आयडीचा वापर करत रेल्वेच्या आरक्षित ई-तिकिटांची अवैध विक्री करणाऱ्या एकास रेल्वे सुरक्षा दलाच्या अकोला चमूने एकास अटक केली आणि त्याच्याकडून १ लाख २४ हजार ८०७ रुपयांची तिकिटे जप्त केली. रेल्वे सुरक्षा दलाने एका संशयास्पद यूजर आयडीची सखोल तपासणी केल्यानंतर *सुहास भास्करराव पाटील* (४६, जठारपेठ, अकोला) याला अटक केली. संशयास्पद यूजर आयडीबद्दल माहिती मिळाल्यानंतर आरपीएफचे तपास अधिकारी रजनीकांत कुमार आणि शिरोमणी संदीप वानखडे यांच्या टीमने आरोपी सुहास भास्कररावपाटील याला नोटीस देऊन ठाण्यात बोलावले.


