तहसिलदार यांना मागण्याचे लेखी निवेदन सादर
सिद्धार्थ कदम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
पुसद /वाशिम:-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या युवा प्रशिक्षणार्थींना नियमित करा अशी मागणी मंगरूळपीर तालुक्यामधील रुजू झालेले सरकारी आस्थापना मधील कर्मचारी लाडका भाऊ यांनी मंगरूळपीर तहसील येथे निवेदन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.मंगरूळपीर येथील तहसीलदार यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली अनेक बेरोजगार त्या निमित्ताने विविध शासकीय विभागात रुजू असून ते आपले कर्तव्य जबाबदारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे पार पडत आहेत त्यांना शासकीय कामांचा अनुभव मार्गदर्शन देखील मिळत आहे प्रशिक्षणार्थी म्हणून बेरोजगार युवकांना कालावधी फक्त सहा महिने आहे हा कालावधी जानेवारी फेब्रुवारी 2025 मध्ये समाप्त होणार आहे त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार आहेत असे होऊ नये म्हणून शासनाने बेरोजगार सध्या ज्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना तिथेच नियमित करावे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानुसार युवा प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनामध्ये कार्यरत आहेत तिथेच त्यांना नियमित करण्यात यावे असे सांगितले होते माजी उद्योग मंत्री व कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील 50% युवा प्रशिक्षणार्थींना कार्यरत असताना नियमित करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.लाडकी बहीण योजना व दुसरी योजना एसटी प्रवासात सवलत शेतकरी आत्मसन्मान व इतर लाभाच्या योजना शासनाने सुरू केले आहेत त्या योजना साठी कोणताही कालावधी निश्चित नाही युवा कार्य प्रशिक्षणातील योजनेचा कालावधी हा फक्त सहा महिन्याचा आहे शासनाने ही अट काढून प्रशिक्षणार्थ्यांना नियमित करावे अशी मागणी वाशिम जिल्ह्यामधील मंगरूळपीर तालुक्यातील सरकारी आस्थापनामध्ये रुजू असलेले कर्मचारी (लाडका भाऊ ) दत्ता ठाकरे ,रुपेश व्यास, सुशील इंगळे ,अविनाश भगत, अजय भगत, आकाश लबडे, सौरभ राठी ,प्रज्ञा भगत, अक्षय इंगोले, सोहम भटकर यांनी केले आहे.


