युसूफ पठान:- वर्धा
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईं यांच्या बेंच जवळ येत वकिलाकडून बूट फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न,सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे अनुसूचित जाती चे असल्यानेच त्यांच्यावर हेतुपुस्पर सनातन धर्मांधवादी आरोपीने अवमान केला आहे.आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी,ब्राह्मणी व्यवस्थेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे.असे विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी पत्रकात म्हटले आहे!
सुरक्षा यंत्रणांकडून आरोपी वकिलाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली,सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही,असे म्हणत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपी वकिलानी केला.जातीव्यवस्था किती घट्ट आहे हे या निंदनीय घटनेवरून लक्षात येते.एका सरन्यायाधीशा सोबत हे होऊ शकते तर सामान्य जनतेचे काय असेल. अनुसूचित जातीच्या सरन्यायाधीशा बाबत कोर्ट मध्ये अशा पद्धतीने प्रकार होणे हे अवमानकारक कृत्य असुन निंदनीय आहे.देशात ब्राह्मणी मानसिकता किती खालच्या स्तरा पर्यंत पोहचली आहे,हे स्पष्ट झाले आहे.
सामाजिक न्याय व आर्थिक निकष वगैरे केंद्र सरकारने सामान्य जनतेला यापुढे सांगू नये.केंद्र सरकारच्या हुकुमशाही मानसिकतेचा सुध्दा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असुन मनुवादी लोकांना वेळीच जेरबंद करावे असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ प्रमुख महेंद्र मुनेश्वर यांनी म्हटले आहे.

