सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद तालुक्यातील आरेगाव या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांची वाघाच्या हल्ल्यामध्ये शिकार झालेली आहे. तरी देखील आता पर्यंत 4 जनावरांच्या वाघाकडून शिकार करण्यात आले आहे अद्यापही कोणत्या शेतकऱ्यांना वन विभाग पुसद कडून कोणत्याच प्रकारची मदत मिळालेली नाही आहे तरी सदर आपणास निवेदन सादर करत आहे की लवकरात लवकर सदर शेतकऱ्यांच्या जनावरांची झालेली नुकसान भरपाई तात्काळ वनविभागाकडून देण्यात यावी व आरेगाव या वन विभागा मध्ये वाघाने असल्या कारणामुळे गावांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व तो वाघ नेहमी शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसून येत आहे यामुळे गावांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

तरी आपणास सर्वसर्व गावकरी मंडळी कडून नम्रतेची विनंती करतो की तात्काळ त्या वाघाला डिटेन करून दुसरीकडे मोठ्या जंगलामध्ये नेऊन सोडावे अन्यथा कोणताच अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे व येणाऱ्या दिवसांमध्ये कोणतेही जीवित हानी न व्हावी याची दक्षता घ्यावी जर एखाद्याची अनुचित प्रकार धरल्यास व रहवासीतील लोकांची जीवित हानी झाली

तर त्याची पूर्ण जबाबदारी ही वन विभाग पुसद यांच्यावर राहील असे निवेदन गोरसेना जिल्हा अध्यक्ष पश्चिम यवतमाळ जय राठोड यांनी वन विभाग पुसद यांना निवेदन दिले.

