महाक्रांती न्यूज ( डिजिटलं मीडिया ) नेटवर्क
साप हा वाघ बिबट,अस्वला प्रमाणे वन्यजीव सुचित आहे मात्र साप मारल्यावर कोणावर वन्यजीव कायद्या अंतर्गत कार्यवाही झाली असे घडत नाही तर वन्यजीव कायद्याच्या वन्यजीव सुचित असलेल्या सापांची हत्या केल्यास, त्याला जायबंदी केल्यास,त्याची चमडी, अवयवांची विक्री केल्यास,त्याला डांबून ठेवल्यास,त्याला वाहनातून प्रवास केल्यास,सापांचे विष काढल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व सुधारित अधिनियम वन्यजीव संरक्षण अधिनियम 2002 प्रमाणे सात वर्षांपर्यंत सक्त मजूरीची सजा व पंचवीस हजार रुपये दंड होतो त्यामुळे सापांची हत्या न करता सर्पमित्र, वनविभाग यांची मदत घेऊन सापांचा जिव वाचवावा असे आवाहन विदर्भ सर्पमित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
सम्यक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर ता देवळी जि वर्धा येथे सर्पविज्ञान आणि पर्यावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सुरकार यांनी साप हा वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यात सुचिबध्द असूनही त्याबाबत वन्यजीव तज्ञ,वनखाते,वनविभाग, वन्यजीव क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यकर्ते,तज्ञ उदासिन आहे सापांच्या अनेक जाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत क्राॅक्रेटीकरण, वृक्षतोड, जंगलतोड, व मानवी हस्तक्षेपामुळे सापांची संख्या रोडावत आहे अनेक जातीचे साप हे आता निदर्शनास येत नाही तर
पावसाळ्यात सर्वात जास्त सर्प दंश होतात अशावेळी विषारी सापांचा दंश झाल्यास व त्याचे लक्षणे लक्षात आल्यास घाबरल्यामुळे सापाला क्रुरपणे मारतात अशावेळी अनेकदा बिनविषारी सापही मारले जातात सरकारी रुग्णालयात नाग,मण्यार,फुरसे,घोणस या चारही विषारी सापांच्या दंशावर हमखास औषध उपलब्ध आहे याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत माहिती नसल्यामुळे आजही लोक साप चावल्यास अवैज्ञानिक,व अघोरी, उपचारासाठी धाव घेतात ज्यात त्यांचा अनेकदा मृत्यू होतो याची दखल महाराष्ट्र शासनाने घेवून २०१३ रोजी जादुटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला आहे जर सांप,विचू,कुत्रा चावल्यास त्यावर अवैज्ञानिक, अघोरी उपचार केल्यास उपचार घेणारा, उपचार करणारा,त्याला सहकार्य करणारे अशा सर्वावर जादुटोणा विरोधी कायदा लागू होवू सात वर्षांपर्यंत सजा व पन्नास हजार रुपये पर्यंत दंड होऊ शकतो त्यामुळे सरकारी रुग्णालयात,पि.ए.सी.सेन्टर, ग्रामीण रुग्णालयातच किंवा सेवाग्राम,सावंगी रूग्णालयात जावे तिथेच आपला जिव वाचू शकतो मात्र या बाबत सरकारी रुग्णालयात, सार्वजनिक ठिकाणी,अभ्यासक्रमात कुठेही माहिती दिल्या जात ाही त्याचा प्रचार प्रसार करताना दिसत नाही त्यामुळे सापांच्या भितीमुळे सापाला मारतात .जो सर्पमित्र जिवाची बाजी लावून घरात घुसलेल्या सापाला सुरक्षित ताब्यात घेऊन कुटूंबाचि भिंतीतून सुटका करून सापाचा जिव वाचवून त्याला सुरक्षित जंगलात सोडतो
त्याला ना सरकार मदत करते ना समाज मदत करतो अनेक सर्पमित्रांचे मृत्यू हे साप पकडताना झाले त्यांना विमापण मिळत नाहीतर वन्यजीव मित्र म्हणविणारे सर्पमित्रांच्या कार्यावरच बोट ठेवून विरोध करतात त्यामुळे वनविभाग सर्पमित्रांवर वन्यजीव कायद्याप्रमाणे कार्यवाही करतात मात्र सापांच्या बाबतीत सरकार दरबारी पुढाकार घेऊन काही कार्यशाळा, चर्चासत्रे, संशोधन पथक, प्रकल्प राबविणे असे घडत नाही त्यामुळे सापा़च्या कित्येक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्याला फक्त वन्यजीव संरक्षण अधिनियम सुचित स्थान दिले पण त्याच्या संरक्षणासाठी वनविभाग कार्यरत दिसत नाही एकटा सर्पमित्र सापांचे जिव वाचवितो पण तोही अनेकदा कायद्यामुळे अडचणीत येतो.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्षभर शाळा महाविद्यालये, ग्रामीण भागात सर्प विज्ञान आणि पर्यावरण याविषयी प्रबोधन व जनजागरण मोहिम राबविते कारण साप हा पर्यावरणाचा महत्वाचा घटक असून अन्नसाखळीत त्याची विषेश भुमिका आहे,त्याच्या विषामुळे सर्पदंशावर च नव्हे तर अनेक औषधी सांठी त्याच्या विषाचा उपयोग केला जातो यावेळी गजेंद्र सुरकार यांनी माहिती देताना म साप विषारी चावला कि बिनविषारी चावला याबाबत कोणालाही माहिती नसते विषारी सापांच्या दंशावर हमखास औषध उपलब्ध आहे याची माहिती सरकारच्या वतीने, आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली नाही सर्पमित्रांच प्रबोधनाच जाळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां लोकांन पर्यंत पोहचल नाही त्यामुळे परंपरागतपणे आजही साप चावल्यानंतर बा-या म्हणने,मंत्र मारणे,काहीसा खडा जखमेवर लावणे,लालमिरच्या,कडू लिंबाचा पाला मोठ्या प्रमाणात खावू घालणे दंशाच्या जागेवर चिरा देणे किंवा हात पाय कापणे तोंडाणे विष ओढणे असे प्रकार उपचा-याच्या नावाखाली केले जातात यासोबतच कुत्रा चावला विंचू,इंगळी चावली तरी वरील प्रकारे अवैद्यकिय उपचार करतात त्यामुळे अनेकदा व्यक्ती मरतात त्यामुळे तुम्हीच यायला वेळ केला असे सांगून उपचार करणारे हात झटकतात कारण त्यांना विषारी बिनविषारी सापांची ओळख नसते त्यामुळे सरकारी रुग्णालयातच नेवून उपचार घ्यावा असे आवाहनही केले यावेळी प्रोजेक्टर च्या माध्यमातून लाईव्ह पध्दतीने विषारी बिनविषारी सापांची माहिती, विषारी सर्पदंशाची लक्षणे, प्रथमोपचार वैद्यकीय उपचार,सापाबद्ल असणारे गैरसमज, अंधश्रद्धा,मानवी जिवनात आणि पर्यावरणात सापांचे असलेले महत्त्व आदी बाबत माहिती देवून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हजारे मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य मा लोहट सर यांनी केले आभार वनकर मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास 3००
च्या वर विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी यांनी सहभाग नोंदविला.

