वर्धा :- युसूफ पठाण
सध्या समस्त शेतकरीवर्गावर अभूतपूर्व असे अस्मानी व सुलतानी संकट आलेले आहे, एकीकडे निसर्ग झोडपत आहे तर दुसरीकडे सरकार पण शेतकऱ्यांसोबत दुश्मनी करत आहे. १४००० कोटींची तरतूद कुंभमेळ्यासाठी करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी फक्त २२०० कोटींची तुटपुंजी मदत जाहीर करून आपला असंवेदनशील पणा दाखवून दिला आहे.
शेतकऱ्यांच्या समस्येवर योग्य विचार करून सरकारचे डोळे उघडण्यासाठी आज वर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष श्री मनोजभाऊ चांदुरकर यांच्या नेतृत्वात भारत सरकारचे पंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना खालील मागण्यांचे दिनांक २६ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी ३.०० वा निवासी उपजिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले.
शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रु पर्यंत अनुदान देण्यात यावे. ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन अतीवृष्टीमुळे खरडून वाहुन गेली किंवा बुडीत झाली अशा शेतकऱ्यांना शेतजमीन दुरुस्तीसाठी विशेष अनुदान देण्यात यावे.जमीनीचा (ई-पीक नोंदणी) न झाले नसेल तरीसुद्धा तात्काळ पंचनामे करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या पाल्यांना (शासकीय व खाजगी संस्थानामधील) शिक्षण मोफत करण्यात यावे. सन २०२५-२६ तसेच २०२६-२७ या वर्षातील शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती लक्षात घेता शैक्षणीक शुल्क माफ करावे तसेच शिक्षणासाठी (शासकीय व खाजगी संस्था) आवश्यक मदत करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कुटुबांकरीता आरोग्याच्या (शासकीय व खाजगी संस्था) सुविधा मोफत करण्यात याव्या. हमीभावानानुसार खरेदी न होत असल्याने तुरी, कापुस व सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झालेले आहे त्याच्यातील फरक मदत म्हणुन देण्यात यावो. भाजीपाला व फळभाग शेतकऱ्यांना विशेष अनुदान त्वरीत देण्यात यावे.
शेतकऱ्यांच्या कुषी पंपावरील सोलर ची सक्ती त्वरीत हटवीण्यात यावी. शेतकऱ्यांना एकुण हमी भावाच्या व्यतीरीक्त एकुण २० टकके बोनस देण्यात यावा. कोणतेही निकष न ठेवता सरसकट कर्ज माफी करुन सातबारा कोरा करण्यात यावा. अतीवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्याच्या जीवनावश्यक वस्तुची गरज आहे अशा शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता त्वरीत पुरवठा करण्यात यावा. बॅकेशी तडजोड करून एकरकमी कर्ज OTS भरणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज मिळत नाही ते त्वरित देण्यात यावे.ओला दुष्काळ जाहीर करुन वरील शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या त्वरीत पुर्ण कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा देण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने डॉ. अभ्युदयजी मेघे, सुधीरभाऊ पांगुळ, बाळाभाऊ माऊसकर, सुनीलभाऊ कोल्हे, सागरभाऊ सबाणे, भारतभाऊ भोंगाडे, संजयभाऊ डोंगरे, संदीपभाऊ महाकाळकर, पंढरीभाऊ महाकाळकर, अनिलभाऊ थोटे, नरेंद्रभाऊ झाटे, वासुदेवभाऊ गूघ, प्रमोदभाऊ नगराळे, सुनीलभाऊ तळवेकर, विलासभाऊ जवादे, नंदकुमारजी वानखेडे, संदीपभाऊ शिंदे, सोहमसिंग ठाकूर, संजयभाऊ कुबडे, अरुणाताई धोटे, लताताई नंदरधने, संगीताताई ठवळे, पवनभाऊ गोसेवाडे, बंडूभाऊ डफरे, सादिकभाई शेख, विजयभाऊ नरांजे, शुभम भगत व श्रीकांत धोटे सह इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


