एका बालकाचा मृत्यु तर शेकडो जन बाधीत.
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद /मागील एक महीन्या पासुन पुसद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आसलेल्या शेंबाळपिंपरी हया गावात डायरीया सदृष्य साथरोगाने आता गावात आनखीनच हात पाय पसरायला सुरुवात केली आहे.मागील काही दिवसा आगोदर एकाच वेळी ४८लोकांना हागवक लागुन दवाखान्यात उपचारा करावा लागला होता.तेव्हा पुसद तालुका आरोग्य विभाग आचानक खडबडून जागा झाला होता. व विषेस खबरदारी म्हनून प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबाळपिंपरी व ग्रामपंचायत शेंबाळपिंपरी हयाना सतर्क राहन्याचा सल्ला दिला होता.

त्यानंतर हळूहळू प्रतेक वार्डात डायरीया सदृष्य लक्षनाने बरेच पुरुष,महीला,बालक बिमार होऊन पुसद,हिंगोली, नांदेड, यवतमाळ येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल होत आसुन .आता पर्यंत शेकडो रुग्नाना हया बिमारीने गाठले आसुन बर्याच जनाच्या किडनी फेल्युअर होत आसुन बरेच जन मृत्युशी झुंज देत आहेत.
नुकतेच शे़बाळपिंपरी येथील वार्ड क्रमांक ६ हया दलीत वस्ती बहुल भागात पुन्हा हागवक हया डायरीया सदृष्य साथरोगात बरेच जन नांदेड व यवतमाळ येथे रेफर केले आहेत.त्यात कालच वर्ग तिसरीत शिकणारा व एकुलता एक आसलेला”” भागेश रमेश मनवर हा बालक एकाच दिवसात हागवक लागल्याने त्याला पुसद येथील शासकीय रुग्णालयात भरती केले होते तेथे त्याची तब्येत आधिकच बिघडल्याने त्याला यवतमाळ येथे रेफर केले होते.पुढील उपचारासाठी नेतांनी वाटेतच त्याचा मृत्यु झाला.त्यामुळे गावात हळहळीसह भिंतीचे वातावरण तयार झाले.
सदर साथरोगा विषयी प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबाळपिंपरी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ निधी हयाच्या कडुन माहीती घेतल्यास सदर साथरोग हा येथील दुशीत पाणी पुरवठयामुळे होतअसल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क आसुन २४तास सज्ज असल्याचे सांगीतले.त्यामुळे ग्रामविकास अधिकारी श्री तुकाराम राठोड हयानी ताबडतोब गावातील पान्याच्या स्त्रोताची तपासनीस व दुरुस्ती सह दलीत वस्तीतुन वाहनारी सांडपाण्याची नाली दुरुस्ती करन्यासाठी सुचना केल्या आहे .

