खर्डी प्रतिनिधी सगीर शेख
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आज राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे नेते अविनाश जाधव साहेब आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाने भिवंडी लोकसभा क्षेत्र अध्यक्ष शैलेश बिडवी साहेब यांच्या हस्ते तालुका अध्यक्ष विजय भेरे साहेब, मनविसे तालुका अध्यक्ष विकी जयवंत मांजे यांच्या अध्यक्षतेखाली अघई विभागातील तानसा येथील तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी जिल्हा सचिव राकेश वारघडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोपतराव, तालुका उपाध्यक्ष दिनेश वेखंडे, हर्षद अस्वले,महिला सेनेच्या केदारे ताई, चौधरी ताई, वासिंद शहर अध्यक्ष अमोल बोराडे,भरत पानसरे,जयराम ठाकरे ,जयेश भेरे, रोहन गगे,कल्पेश शेलार,वैभव काठोळे, शेखर गगे, अमोल धपाटे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्तीय होते.

