वर्धा: युसूफ पठान
वर्धा, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने येत्या २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता वर्धा शहरात एक भव्य खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांची उपस्थिती असून, राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हेही या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा वर्ध्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल येथून सुरू होणार छत्रपती शिवाजी महाराज चौक, आर्वी नाका येथून जाणार असून, धावपटू शासकीय आयटीआय काॅलेज टेकडी येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही नोंदणी फी नाही,मोठ्या प्रमाणात बक्षीस, तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सर्व वयोगटातील धावपटूंनी व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेदरम्यान तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील युवकांना आणि खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज शिंदे व पदाधिकारी करत असून, शहरात एक सकारात्मक आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा त्यामागचा उद्देश आहे. मॅरेथॉनद्वारे तरुणांमध्ये आरोग्याची जाणीव, खेळाची आवड आणि सामाजिक एकोप्याची भावना निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

