वर्धा: युसूफ पठान
वर्धा : दिक्षाभूमी नागपूर ते सेवाग्राम आश्रमपर्यंत २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान गांधीजींचे पणतू , जेष्ठ विचारक माननीय तुषारजी गांधी यांच्या नेतृत्वात होणार्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची पूर्वतयारी बैठक किसान अधिकार अभियान कार्यालय, वर्धा येथे संपन्न झाली.
वर्ध्यातील सिव्हिल सोसायटीच्या संस्थांकडून ५० हून अधिक लोक पदयात्रेत सहभागी होणार असून, त्यापैकी २० सदस्य संपूर्ण कालावधीत पदयात्रेत राहतील. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या पदयात्रींच्या बैठकीत सर्व बाबींवर सविस्तर चर्चा व स्पष्टता करण्यात आली.या यात्रेचे नेतृत्व हम भारत के लोग तुषार गांधी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांसह विविध पक्षांचे प्रमुख नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. नागपूर येथील दिक्षाभूमीपासून वर्ध्यापर्यंत ७५ जण पूर्णवेळ पदयात्री राहतील, तर वर्ध्यातून १५६ जण सहभागी होतील. देशभरातून ५०० हून अधिक पदयात्री या संविधान सत्याग्रह पदयात्रेत सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
मार्ग व कार्यक्रम३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पदयात्रेचा वर्धा जिल्ह्यात प्रवेश सेलडोह येथे होईल. सेलडोह, खडकी, आमगाव, केळझर येथे सभा व खडकी देवस्थान येथे मुक्काम असेल.१ ऑक्टोबर रोजी केळझरहून पदयात्रा महाबळा, कोटंबा, गायमुख, घोराड विकास चौक, यशवंत महाविद्यालय सेलू चौक मार्गे पवनारकडे निघेल. या दिवशीचा मुक्काम महात्मा लॉन, वर्धा येथे असेल.२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता महात्मा लॉन येथून प्रस्थान करून सकाळी ८ वाजता गांधी प्रतिमेला अभिवादन केले जाईल.
यानंतर सेवाग्राम चरखा भवन येथे सार्वजनिक सभेत पदयात्रेचा समारोप होईल.बैठकीतील मार्गदर्शन व सहभागपदयात्रेच्या नियमावली व जबाबदाऱ्या याबाबत ज्येष्ठ गांधीवादी अतुल शर्मा यांनी मार्गदर्शन केले. अॅड. अविनाश काकडे यांनी जिल्ह्यातील पडाव व कार्यक्रमांचे सविस्तर विवेचन केले.
बैठकीत मुख्य प्रेरक अविनाश काकडे, ज्येष्ठ गांधीवादी अतुल शर्मा, ज्येष्ठ नाट्यकर्मी हरीश इथापे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर, आदिवासी काँग्रेस कार्याध्यक्ष नरेंद्र मसराम, सतीश आत्राम, महेंद्र शिंदे, जिल्हा सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, प्रशांत गुजर , किसान अधिकार अभियानचे उपाध्यक्ष विठ्ठल झाडे, संघटक गोपाल दुधाने, सचिव प्रफुल कुकडे, राजू वानखेडे, जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण भायर ,चंद्रकांत ढगे, उमेश नारांजे, राजेश बाळसराफ, मालती देशमुख, ज्योती पासवान, गणेश सुरकार, अनिल राऊत, शशीकांत विरखेडे, प्रविण पेठे, राष्ट्रपाल गणविर, विजय नारांजे, अनंतराव ठाकरे, मोहन ठाकरे, प्रफुल नागोसे, प्रविण कांबळे अक्षय देशमुख, प्रणय खोडे, राजू कंगाले यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
*मुख्य आयोजन समिती :* तुषार गांधी, गुड्डी, फिरोज मिठीबोरवाला, एड. अविनाश काकडे, अतुल शर्मा, संदेश सिंगलकर, सुदाम पवार, जगजितसिंह, विकास झाडे.*पदयात्रेची उद्दिष्टे :*“संविधानासाठी बापूंच्या मार्गाने चालायचे आहे. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या विचारांतून देशाची उभारणी करायची आहे,” हे या पदयात्रेचे मुख्य ध्येय आहे.


