अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकरअकोला – कसांडी या ग्रामीण व शहरी जीवनावर आधारित लघु चित्रपटाच्या शूटिंगचा प्रारंभ चांदूर या भागामध्ये करण्यात आला एका शेतकऱ्याच्या वडिलांची कथा असलेला हा लघुपट अनिल मालगे प्रोडक्शन व या सिनेमाचे निर्माते म्हणून सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झिंगाची तायडे व दिग्दर्शक म्हणून सचिन गिरी हे काम पाहत आहेतया सिनेमाचे शूटिंग अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सुरू असून यामध्ये स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आल्याचे चित्रपटाचे निर्माते प्रकाश तायडे यांनी सांगितले
हा सिनेमा अनिल मालगे प्रोडक्शन च्या बॅनरखाली तयार करण्यात येत असून यावेळी सिनेमाच्या शूटिंगचा प्रारंभ चांदूर भागामध्ये अकोला जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांच्या हस्ते गणेश मूर्तीची पूजन करून हार अर्पण करण्यात आला यावेळी श्री जरांगे, शिवा झापर्डे यांच्यासह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. आलेल्या सर्व पाहुण्यांचे व सर्व कलाकारांचे स्वागत प्रकाश तायडे ,सचिन गिरी ,यांनी केलेअनिल मालगे यांच्या संपूर्ण नियोजनामध्ये हा सिनेमा तयार होत असून लवकरच हा सिनेमा तयार होईल असे निर्माता प्रकाश झिंगाची तायडे यांनी सांगितल.



