युसूफ पठान:- वर्धा
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे वयात येताना लैंगिकता प्रबोधन मोहीम
*राज्य विविध उपक्रम विभाग आणि वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग तर्फे “वयात येताना-लैंगिकता प्रबोधन” हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे या प्रबोधना अन्तर्गत नेहरू माध्यमिक विद्यालय,सालोड जि वर्धा येथे मुलींसाठी वयात येताना हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना मुल मुली वयात येताना.त्याच्यांत होणारे शारीरिक व भावनीक, मानसिकरित्या होणा-या बदलांनी मुली पार गोंधळून जातात कारण पाळी येणे हा प्रसंग त्यांच्या जिवणात त्यांना प्रथमच अनुभवायला येतो अशा काळात मुलींनी पाळी सुरू झाल्यावर गोंधळून न जाता आई,शिक्षकेला नसंकोचता सांगायला पाहिजे तर आई व महिला शिक्षकांनी पाळी सुरू झालेल्या मुलींच्या बदलांकडे सुक्ष्म निरीक्षण ठेवले पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहर शाखा कार्याध्यक्ष कविता राठोड यांनी केले
- लैंगिक शिक्षण हे उद्दिष्ट समोर ठेऊन रघुनाथ धोंडो कर्वे (र.धों. कर्वे) यांनी १५ जुलै इ.स. १९२७ ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली, त्या निमित्ताने या विषयाच्या अनुषंगाने प्रबोधनपर अभियानाचे आयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य भर करत आहे या प्रबोधनाचा भाग म्हणून वर्धा जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या पुढाकाराने व शालेय महाराष्ट्र विवेक वाहिनी यांच्या पुढाकाराने नेहरू माध्यमिक विदयालयात वर्ग आठ ते दहा च्या मुलींसाठी वयात येताना या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली ठाकरे,पुजा सावरकर, कविता राठोड प्रामुख्याने उपस्थित होते पुढे मार्गदर्शन करताना कविता राठोड यांनी मुलींना प्रथमच आलेल्या पाळीच्यावेळी आपल्या मुलीला विश्वासात घेऊन मैत्रीण बनून त्याबद्दल अतिशय शांतपणे समजावून सांगितले पाहिजे शारीरिक स्वच्छता कशी ठेवावी,पाळीच्या दिवसात होणारा त्रास आदी बाबत माहिती देवून गरज पडल्यास महिला डॉक्टरकडे घेऊन जावे तिचे योग्य ते समुपदेशन करावे यासह शारीरिक बदलांमुळे पौगंडावस्थेतल्या मुलांच्या मनात लैगिंकतेसंबंधी अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळाली नाहीत, तर त्यांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतात. हे गैसमज दूर व्हावे, वयात येताना होणारे शारीरिक, भावनिक बदल, स्त्री-पुरुष संबंध, मासिक पाळी, गर्भधारणा, समलिंगी संबंध, या सर्वांची वयानुरूप योग्य ती शास्त्रीय माहिती देणे. तसेच गर्भाचे लिंग कसे ठरते इथपासून ते एकतर्फी प्रेम म्हणजे काय? केव्हा करावे, गुप्तरोग, एड्स या सर्वांची शास्त्रीय माहिती दिली, यासाठी वर्धा जिल्हात शाळा-कॉलेजमध्ये “वयात येताना-लैंगिकता प्रबोधन” अभियान राबविण्यात येत आहे असे अतिशय सोप्या भाषेत सांगितले तर पुजा सावरकर हिने
- पि.पि.टी.व मराठी विज्ञान परिषदे व्दारे निर्मित वयात येताना फिल्म व्दारे समजावून सांगितले याप्रसंगी मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना शास्त्रीय आधारावर उत्तरे देवून विद्यार्थींचे समाधान केले

