अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
बार्शिटाकळी तालुक्यातील येवता रेल्वे गेटजवळ अंदाजे ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत महिलेचे नाव रमा असल्याचे सांगितले आहे, मात्र तिची सविस्तर ओळख अद्याप पटलेली नाही. हा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून, कोणालाही सदर महिलेची ओळख असल्यास बार्शिटाकळी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाईल नंबर 7020035915


