10 दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास चामोर्शीत महाआंदोलन – राज बन्सोड यांचा इशारा
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
गडचिरोली : चामोर्शी–हरणघाट मार्गाची अत्यंत दुरावस्था, वारंवार होणारे अपघात आणि विद्यार्थी-रुग्णांसाठी रस्ता डोकेदुखी ठरल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजाद समाज पार्टी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने भेंडाळा येथे तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व काँग्रेसचे चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत यांनी केले.
आंदोलनात परिसरातील जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित असून विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. शाळेत जाने येणेसाठी कसरत करावी लागतं असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

काँग्रेस चे तालुकाध्यक्ष यांनी थातर मातुर काम केल्यास गप्प बसणार नाही असे खडे बोल सुनावले.
तसेच आसपा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले असून, सामान्य जनतेच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले असतानादेखील प्रशासन झोपेत असल्याचा आरोप करत येत्या 10 दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास चामोर्शीत हजारोच्या संख्येने महा आंदोलन करण्याचा इशारा राज बन्सोड यांनी दिला.
आंदोलन स्थळी बांधकाम विभागाचे अधिकारी बड्डे साहेब यांनी भेट देऊन रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिले.
या प्रसंगी आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम व युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
आंदोलनात आजाद चे प्रभारी हंसराज उराडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल मरसकोल्हे, महिला अध्यक्ष सोनाशी लभाने, शोभा खोब्रागडे, सविता बांबोळे, सतीश दुर्गमवार, सोनू कुमरे, प्रेम मडावी, धनराज दामले, साखरे, नितेश वेसकडे, मोसम मेश्राम तसेच काँग्रेस चे दिलीप वनकर, राजेश ठाकूर, निकेश गद्देवार, प्रेमानंद गोंगले, हेमंत कोवासे, राहुल पोरतेट यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


