सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महागाव /काळी दौ
महागांव तालुक्यात सतत सुरु असलेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्याचे तसेच गावकऱ्याचे अतोनात नुकसान झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेद्वारे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी संध्या संदेश रणवीर, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस, शरदचंद्र पवार, महागाव यांच्या वतीने कृषिमंत्री, महाराष्ट्र शासन, विभागीय आयुक्त, अमरावती,जिल्हाधिकारी, यवतमाळ,उपविभागीय अधिकारी,उमरखेड व तहसीलदार, महागाव यांना निवेदनातून देण्यात आली आहे.

मागील पंधरवड्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीने व सुरु असलेल्या पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्याची उभे पीक जमीनदोस्त झालेली आहेत व सतत होत असलेल्या पाण्यामुळे पिके ही उन्मळून पडून वाळत आहेत, सोबतच गावातील घरांची पडझडं झाली आहे. गुरे,ढोरे वाहून गेले आहेत यामुळे जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झाले असून यासर्व बाबींचा विचार करून आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या वतीने संपूर्ण तालुक्यात पंचनामे करून शेतकऱ्यांना व गावांतील पीडितांना आर्थिक मदतीचा आधार द्यावा व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत शेतकऱ्यांना व पीडितांना द्यावी अशी निवेदनातून मागणी रणवीर यांनी केली आहे


