:८सप्टेंबर २०२५
मुबंई प्रतिनीधी:
(सतिश वि.पाटील)
मुंबई महापालिकेतील मुलुंड येथे सेवा राम लालवानी शाळेमध्ये शिक्षण घेणारी माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी कुमारी अनुश्री जाधव हिचा सुंदर आवाज आणि गाण्याकडे संगीत विषयाकडे जास्ती ओढ आहे हे लक्षात घेऊन तिचा गाण्याचा कार्यक्रम सुगम संगीत संध्या आयोजित केला होता. यामध्ये भावगीत ,भक्तिगीत ,लावणी आणि गझल सुद्धा …..यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाची संकल्पना श्री संतोष आगटे* यांची होती. या कार्यक्रमात मेधा दिवेकर (कथक नृत्य आर्टिस्ट मुलुंड)यांच्या विद्यार्थिनींनी कथक नृत्य खूप सुंदर रित्या सादर केले आणि रसिकांची दादही मिळवली. याप्रसंगी संगीत क्षेत्रातले व सामाजिक कार्यातील अनेक स्थानिक मान्यवर रसिक श्रोते आणि पत्रकार आवर्जून उपस्थित होते.

त्यांनी बालकलाकार अनुश्री चे भरभरून कौतुक करून बक्षिसेही दिली. कीबोर्ड वर श्री. पाटील व श्री. शिधये तबला – श्री संतोष आगटे व ढोलक ढोलकी श्री. विनय चौगुले यांची समर्पक अशी संगीत साथ लाभली. कार्यक्रमाची संकल्पना व संयोजक श्री संतोष आगटे (निदेशक मुंबई महापालिका शिक्षण विभाग) व सहसंयोजक श्री विनय चौगुले (निदेशक संगीत विभाग मुंबई महानगरपालिका) यांचे होते. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीम. गौरी आठल्ये यांचे होते.
या कार्यक्रमासाठी या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. प्रजापती मॅडम यांचे पण अनमोल सहकार्य लाभले. अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
अशा या कार्यक्रमात सर्व रसिक मंत्रमुग्ध झाले होते.


