अकोला विभाग प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
जय बजरंग गणेश उत्सव मंडळाच्या गणेश विसर्जनानंतर वापस येत असताना पातूर रोडवर रविवारी रात्री भीषण अपघात झाला.
या अपघातात रामचरण अंधारे (रा. शिवसेना कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विनोद डांगे, विकी माळी आणि खोंड हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकी आणि कारची जोरदार धडक झाल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले.
जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे


