महाक्रांती न्यूज नेटवर्क
पुसद I माणूसकीची भिंत सोशल फाऊंडेशन हे मागिल नऊ वर्षा पासून सामाजिक मानवीय कार्य करत आहे येथे गरजवंत व्यक्तीला दोन वेळेचे भोजन व कपडे दवाखाना व इतर सर्व काही मदत करते माणूसकीची भिंत चे अध्यक्ष तसे पर्यावरण प्रेमी श्री गजानन भाऊ जाधव यांनी जे कार्य हाती घेतले ते खरोखरच समाजात आदर्श निर्माण करण्या योग्य आहे

वाढदिवस असो किंवा इतर काही कार्यक्रम ते वेळोवेळी मार्गदर्शन सल्ला ते स्वता समोर येऊन करतात सामाजिक कार्यकर्ते असो पत्रकार असो किंवा सामान्य व्यक्ती श्रीमंत व्यक्ती इथे काही समान वागणूक देतात माणुसकीचे खरोखर दर्शन येथे मिळते आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी दैनिक महाक्रांती न्युज पोर्टल चे प्रतिनिधी सिद्धार्थ कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात करण्यात आला या वेळेस केक कापून वृक्ष रोपटे देण्यात आले यावेळी माणुसकीचे सर्व सदस्य पत्रकार व मित्र मंडळी यांची उपस्थिती होती


