वर्धा प्रतिनीधी: – युसूफ पठान
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या दाट नागरिकरणामुळे,औद्योगीकरणामुळे पर्यावरणाची जी हानी होत आहे व प्रदूषणामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन बिघडत आहे.त्यावर मात करण्यासाठी व परिसर हिरवेगार करण्यासाठी सावंगी मेघे येथे स्थित स्वप्ननगरी रहिवासी कल्याण सोसायटी द्वारे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत व लेखक सुभाष खंडारे होते.प्रमुख पाहुणे मणून पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लि.चे अधिकारी संपथ व श्रीकांत उपस्थित होते.याप्रसंगी स्वप्ननगरी च्या गार्डनमध्ये सदस्याद्वारे 100 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.त्याचप्रमाणे विशेष उपस्थिती म्हणून अशोक मौर्य, ताराचंदजी भगत प्रामुख्याने उपस्थित होते.

पाहुण्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व व आवश्यकता सांगितली.तसेच याप्रसंगी स्वप्न नगरी परिसरातील सन्माननीय सदस्य गण प्रतीक चौधरी,इंद्रजीत वाघमारे,निलेशजी खोब्रागडे,निलेशजी कांबळे,गौतम गणवीर,संतोष सहारे,अमिन शेख,प्रशांत गडलिंग,शशांकजी गावरेकर,प्रमोद झिलपे,अमित गुडदे,रुपेश मांधडे,गंगाधरजी खंडारे
तसेच महिला सदस्या श्रीमती नाजुका चौधरी,नेहा झिलपे,डॉ. अश्विनी गोतरकर,पुनम मसराम, श्रीमती चंदाताई खंडारे श्रीमती अनिता खंडारे,सारिका बडे,लता भलावी,छाया चौधरि,लीला पुरी, प्रियंका बोरकर या तसेच मॉर्निंग वॉक ग्रुपचे सर्व सदस्य मनीष हांडे पंकज हांडे,सुनील धनवीज,राष्ट्रपाल थुल,प्रशांत नांदेकर,बलबीर, पोलीस पाटीलअतुलजी कांबळे,राहुल हनुले, राहुल वानखेडे,अशोक अलोने व
स्वप्ननगरी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
वृक्षारोपणाची विशेष जबाबदारी ही फाल्गुनी नर्सरी उबाळी कळमेश्वर चे प्रमोदभाऊ बसोले,ऋषिधर मरसकोल्हे,सरपंच ग्राम उबाळी नरेंद्रभाऊ शंभलकर,उपसरपंच ग्राम उबाळी अमित इमनाती,गौरव राजुरकर यांनी पार पाडली.
कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा माजी सैनिक प्रवीण पेठे यांनी व संचालन महेश मसराम यांनी व प्रास्ताविक दीपक बोरकर यांनी केले.
वृक्षारोपणाचा कार्यक्रमसाठी दिलीप उरकुडे ,रमेश साठोणे,डॉ. सुनील थिटामे, डॉ.पवन वानखेडे यांनी व परिसरातील युवक युवतींनी विशेष परिश्रम घेतले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


