मालेगाव (प्रतिनिधी) : महाक्रांती न्यूज नेटवर्क
दिल्ली, नोएडा सेक्टर येथील लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण संस्थान एवं भारत भारती मंचद्वारे देश पातळीवर भारतीय स्वतंता दिवस १५ ऑगस्टला देशभक्तीपर कवितांच्या व्हिडिओंची स्पर्धा घेण्यात आली होती. यात देशभरातून ७४० कवी -कवयित्रींनी सहभाग घेतला होता. एकापेक्षा एक सरस अशा कवितांच्या ३० व्हिडिओमधून देश पातळीवरील पहिल्या तीन कवींमध्ये राष्ट्रीय कवी, लेखक समीक्षक संजय मुकूंदराव निकम यांची विशेष प्रमुख अतिथी म्हणून निवड करण्यात आली. त्यांची हिंदी कविता ‘आजादी मिले हुए साल’ ही कविता देशभरातील रसिक प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या पसंतीस उतरली. या कवितेने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रोत्यांकडून दाद मिळवली.
राष्ट्रीय कवी संजय मुकूंदराव निकम यांना कार्यक्रमास येण्याबद्दल विशेष निमंत्रण देण्यात आलेले आहे. लालबहाद्दूर शास्त्री प्रशिक्षण संस्थान एवं भारत भारती मंचद्वारे त्यांचा विशेष स्मृती चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा भव्य दिव्य कार्यक्रम दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी नोएडा सेक्टर, दिल्ली येथे होणार आहे.

या कार्यक्रमास सर्व देशभरातील साहित्यीक, कवी, विचारवंत, उद्योगपती आणि ज्येष्ठ नागरीक यांची उपस्थिती राहणार आहे. असे आयोजकांनी परिपत्रकाद्वारे कळविली आहे.


