ठाणे महाक्रांती न्यूज नेटवर्क (प.) : महात्मा फुले रोड, नौपाडा येथील स्वामी नारायण मंदिरासमोर शनिवारी दुपारी झाडाची मोठी फांदी कोसळून एक कार व स्ट्रीट लाईट पोलवर नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
शनिवारी (दि. ६ सप्टेंबर) सायंकाळी साधारण ४.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ह्युंदाई वेन्यू (MH ४७ AN ३२९३) ही कार, ज्याचे मालक असित गुप्ता आहेत, तिच्यावर झाडाची फांदी पडली. यात कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. तसेच शेजारील स्ट्रीट लाईट पोलही झुकला.
घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभाग, ठाणे महापालिका विद्युत विभाग तसेच नौपाडा पोलीस स्थानकातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फांदी कापून बाजूला करण्यात आली असून परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले की, दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, संबंधित विभागांनी नुकसान झालेल्या स्ट्रीट लाईट पोलची तात्काळ दुरुस्ती करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


