वर्धा प्रतिनिधी: – युसुफ पठाण
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अनुचित पद्धतीने फोनवरून दमदाटी केल्याची घटना घडली आहे. ही घटना राज्यातील कायदा व सुव्यवस्था यंत्रणेवर थेट दबाव आणणारी असून पूर्णपणे असंवैधानिक आहे.
भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 सर्व नागरिकांना समान कायद्याचे संरक्षण हमी देते. परंतु सत्तेच्या पदावर बसलेले लोक स्वार्थासाठी कायद्याचे उल्लंघन करत आहेत, हे या घटनेतून स्पष्ट होते. राज्य सरकारचा हा मनमानी कारभार जनतेला भीतीदायक व लोकशाहीला घातक आहे.
या घटनेचा महाविकास आघाडी च्या वतीने घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला .
यावेळी अविनाश काकडे मुख्य प्रंरक किसान अधिकार अभियान, सुनील राऊत – जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मनोज चांदुरकर – जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, यशवंत झाडे – राज्य उपाध्यक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, द्वारका इमडवार – जिल्हा सचिव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, भैय्या देशकर – सचिव, कम्युनिस्ट पार्टी, प्रमोद भोबले – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महेंद्र मुनेश्वर – विदर्भ प्रमुख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , सुदाम पवार जिल्हाध्यक्ष किसान अधिकार अभियान , प्रा. प्रवीण भोयर – अध्यक्ष, जिल्हा सर्वोदय मंडळ वर्धा, किरण ठाकरे – अध्यक्ष, युवा संघर्ष मोर्चा, प्रा. जनार्दन देवतळे – सत्यशोधक समाज, नितेश कराळे – प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मंगेश शेंडे – आम आदमी पार्टी, सुनील घीमे – किसान सभा, संजय काकडे – अध्यक्ष, राष्ट्रवादी किसान सभा, नरेंद्र मसराम – जिल्हा कार्याध्यक्ष, आदिवासी काँग्रेस कमिटी, मिलिंद हिवलेकर – वर्धा विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, संदीप किटे – प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सतीश आत्राम – सचिव, आदिवासी काँग्रेस कमिटी, प्रवीण पेठे – माजी सैनिक संघटना, योगेश घोगरे – भूमिपुत्र संघर्ष वाहिनी तसेच खुशाल बावणे, अजय हिवंज, विनोद पांडे, गौरव खोपाळ, इंजी. शशिकांत विरखेडे आदी विविध नागरी संघटनांचे प्रतिनिधि उपस्थित होते



