महाक्रांती न्यूज नेटवर्क
जामा मस्जिद येथून सकाळी ८ वाजता मिरवणुकीची सुरुवात झाली.संपूर्ण शहरातून ही मिरवणूक फिरली,ज्यामध्ये मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला.
मिरवणुकीदरम्यान नात पठण, सलाम पठण
आणि अमन, प्रेम आणि भाईचाऱ्याचा संदेश देण्यात आला.
शहरातील गल्लीबोळ सजवण्यात आले होते
आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या प्रसंगी थानेदार साहेब व PSI साहेब यांचे
स्वागत व सत्कार असद खान व बाबा भाई यांनी केला,
तसेच AIMIM शहराध्यक्ष फ़ाज़िल खान यांनी
पत्रकार बांधवांचा सन्मान करून
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.
संपूर्ण कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही
आणि पोलिस प्रशासनाने उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


