2 आरोपीता विरुद्ध गुन्हा दाखल 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ..
युसूफ पठान:- वर्धा प्रतिनीधी
अल्लिपूर रोडवर अपघात झाल्याने वाहतूक पोलीस अंमलदार हें मा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या आदेशानुसार अल्लीपूर हायवे रोडवर नाकाबंदी करून अवैध प्रवासी वाहतुकीच्या केसेस करीत होते तेव्हा तळेगाव टाळतुले गावाकडून एक बिना नंबर चे ट्रकटर पोलिसांना पाहून वेगाने पळून जावू लागले त्याचा संशय आल्याने त्यास पाठलाग करून त्या ट्रेकटकर पाहानी केली असता त्यामध्ये जॉनडियर कम्पनी चे ट्रकटर एक ट्राली ज्यात नदीपात्रातून ओली रेती वाहतूक करताना दिसून आले त्यास ड्रायव्हिंग लायसेन्स, रजिस्ट्रेशन नंबर रेतीची रॉयल्टी बाबत विचारणा केली असता कोणतेही कागदपत्र त्याने सादर केलेले नाहीत
रेती त्यांनी तळेगाव टालातुले तें भिवापूर रोडवरील नाल्यातून चोरी करून आणले असून तें विक्री करीता नेता आहेत रेतीची रॉयलटी वगैरे काहीही नाही आहे, त्यावरून आरोपी 1)चंद्रकांत माधव लाखे रा तळेगाव 2) मंगेश गजानन मरघळे रा तळेगाव टाळातुले यांच्या जवळून1) एक जॉनडियर कम्पनी चे ट्रकटर किमत 5 लाख रुपये,2)एक ट्रॉली कि 1 लाख रुपये3) एक ट्रॉली भर रेती किमत 7000 रुपये असा 6 07.000 रुपयांचा अवैध रेती चोरी चा मुद्देमाल वाहतूक पोलिसांनी जप्त करून अल्लीपूर पोलिसांच्या ताब्यात कार्यवाही करीता देण्यात आलेले आहेत वरील दोन्हीही आरोपी विरुद्ध BNS कलम 303 वाळू रेती चोरी, 3/181.177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास पो हवा अजय शेंडे पो. स्टे. अललिपूर हें करीत आहेत,


