वर्धा विभाग प्रतिनिधी – युसूफ पठाण
मुस्लिम सोशल फोरम तर्फे ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने भव्य शुभेच्छा मंडप बजाज चौक, वर्धा येथे उभारण्यात आला होता.
या मंडपाला आज वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री मा. डॉ. पंकज भोयर यांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादुन्नबीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा मंडपाच्या भेटीदरम्यान मुस्लिम सोशल फोरमचे पदाधिकारी एस .के. सलीम उर्फ सल्लू भाई, असिफ खान, सलीम भाई कुरेशी.ओवेस खान.डाँ अभ्युदय मेघे, रिझवान पठाण, आसिफ खान, अकरम शेख, ताहीर शेख,इद्दू भाई व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे स्वागत केले .

मुस्लिम बांधवांनी दिलेल्या आत्मीय सत्कारास मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रतिसाद देत सर्वांना सद्भावनेचा व समाजकल्याणाचा मार्ग अंगीकारण्याचे आवाहन केले.मुस्लिम सोशल फोरमच्या वतीने उपस्थित मान्यवरांनी मंत्री महोदयांचे आभार मानले व पुढेही समाजहितासाठी असे कार्यक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुस्लिम सोशल फोरमच्या वतीने सर्वांना ईद ए मिलादुन्नबीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या..


