१०५ वा गणपती विसर्जन सोहळा पडला पार…..
आशिष जाचक:- प्रतिनीधी ( महाक्रांती न्यूज नेटवर्क)
बालगणेश मंडळ कुरझडी (जा.)गणपती स्थापना इ.स.१९२० पासून एक गाव एक गणपती उत्सव परमपरा आजही कायम असून ह्या वर्षी १०५ वर्ष पूर्ण झाले असून आज विसर्जन सोहळा, गावातील सर्व भजनी मंडळे ,दिंडी,टाळ,मृदूंग ,गजर फुगडी च्या खेळानी अतिशय आनंद उत्सवात गणपती विसर्जन कोणत्याही प्रकारचा वाजा गाजा, डीजे ध्वनी प्रदूषण पर्यावरणाची कोणतीही हानी न करता .आमचा गणपती दरवर्षी निरोप घेत असतो.
आणी समाजिक एकोपा व ह्या १०दिवसात कला ,क्रीडा ,सांस्कृती व संस्कृती जोपासना ,असा सुखद संदेश देऊन जातो.ह्यातच प्रत्येक समाज बांधव आपापल्या चौकात भव्य लन्गरचे आयोजन करण्यात येते.गावातील सर्व दिंडी सोहळ्या पालखीचे रस्ते स्वछ करून रांगोळीने सजले जाते.ह्या उत्सवात गावातील वातावरण अगदी आनंद उत्साह व धार्मिक प्रवाहात गणपती बाप्पाचा निरोप घेते.
आणी पुढच्या वर्षी लवकर या असे जयघोश करून साखडे घातल्या जाते.ह्या उत्सवात प्रामुख्याने बाल गणेश मंडळ अध्यक्ष श्री महेंद्र तळवेकर, साहेबरावजी गरड, सुभाषरावजी बोकडे,कार्याध्यक्ष सुभाषराव भालकर,भीमरावजी घोडे,अशोकराव पांडे,विट्टल दुर्गे,रवी भिडकर,आशिष दुर्गे,संदीप पोलकडे,हिरामण पोलकडे,संतोष बोरकर,यशवंत बोरकर,यादव दुर्गे,शेखर नानवतकर,संजय पांडे,दामोजी नावडे,पांडुरंग दुर्गे,किशोर तळवेकर, गुणवन्त लडी,श्याम भालकर,दीपक तळवेकर, सोहंम दुर्गे .व समस्थ गावकरी आणि प्रामुख्याने शिवभक्त मित्र परिवार कार्यरत व सहकार्यात असते.

