पियुष गोंगले:- प्रतिनीधी गडचिरोली विभाग
एटापल्ली : भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.एस. एन. बुटे होते, तर सत्कारमूर्ती डॉ. विनोद पत्तीवार, डॉ.निलेश दुर्गे, डॉ.व्हि.ए. दरेकार तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बि.डी. कोंगरे, डॉ. श्रुती गुब्बावार, प्रा.भारत सोनकांबळे, प्रा. चिन्ना पुंगाटी, प्रा.राहुल ढबाले, डॉ.स्वाती तंतरपाळे, प्रा.अतुल बारसागडे, डॉ.साईनाथ वडस्कर, श्री. राजेश हजारे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे यांच्या हस्ते पीएच.डी. मिळाल्याबद्दल डॉ. विनोद पत्तीवार(ग्रंथपाल) आणि डॉ.निलेश दुर्गे(अर्थशास्त्र विभाग) यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर सहयोगी प्राध्यापक पदी पदोन्नती झाल्याबद्दल डॉ.व्हि.ए. दरेकार(राज्यशास्त्र विभाग प्रमुख) यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी प्रा.राहुल ढबाले यांच्या बि.एससी. सेमी I बेसिक बॉटनी आणि सेमी.III प्लांट इकॉलॉजी, प्रा.अतुल बारसागडे यांच्या बि.एससी. सेमी III टेक्स्टबुक ऑफ केमिस्ट्री तर डॉ. श्रुती गुब्बावार आणि डॉ.स्वाती तंतरपाळे यांच्या बि.एससी. सेमी II ओ.इ.- पर्यावरणीय जीवशास्त्र आणि एस.ई.सी.- क्लिनिकल लॅबोरेटरी टेक्निक्स -II लिखित पुस्तकांचे अनावरण आणि लेखकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बुटे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामलु दुर्वा आणि कृषीत लेकामी तर प्रास्ताविक गणेश कालंगा आणि आभार प्रदर्शन रितेश उसेंडी यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


