मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला
अकोला प्रतिनीधी: – इमरान खान सरफराज खान
बार्शिटाकळी: आम्हाला तालुक्यात स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याबाबत
बेरज असलेले व पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळविण्याबाबत त्यांच्या नावाचे स्वतःची जागा नाही व शासकिय जागा राहात असलेल्या जागेचे नियमांनुसार करून मिळविण्याबाब
आपणास वरिल विषयाबाबत कळविण्यात येते की, विहीरमाच्या महान ता. बारशिटाकळी येथील गोर-गरीब जनता आपले लहान मोठे व सर्व समाज एकत्र राहतात व गेल्या ५० ते ६० वर्षापासून नविन वस्तीत विहीर माच्या हद्दीमध्ये वास्तव्य करीत आहे. एवढे वर्ष होऊन सुद्धा आजपर्यंत स्वतंत्र म्रुत व्यक्तीला अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी उपलब्ध नाही व अंत्यविधी करता साली अंत्यविधी साठी ठराविक जागा नसले मुळे ह्या गावा तालुक्यामध्ये सर्वात मोठे गाव असून या गावाला स्मशानभूमी तसेच स्मशानभूमीसाठी सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.

आज रोजी सदस्यांच्या सुविधेमध्ये नाल्यासमोर म्रुतदेह ठेवावे लागत असून तालुक्यात स्मशानभूमी ३ किमी. अंतरावर आहे. सदर वस्तीतून स्मशानभूमी पर्यंत जातांना अत्यंत अरुंद रस्त्यावरून ३ किमी. अंतरावर एक स्मशानभूमी तिथे जाण्याकरिता कोणताही योग्य रस्ता उपलब्ध नाही. मृत घेऊन जातांना प्रेतवाही व नातेवाईकांना अत्यंत इजारा होऊन विहीरमाच्या प्रेत घेऊन जातांना प्रेतवाही व नातेवाईकांना अत्यंत त्रास होतो.
त्यामुळे सदर विहीर माच्या वस्तीत स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावी तसेच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्क्या रस्त्याची उपलब्धता करून देण्यात यावी जेणेकरून मृत प्रेतवाही अडचणीत येणार नाही.

त्याचप्रमाणे महान ग्राम पंचायती अंतर्गत विहीर माच्या महान वसाहतीमध्ये ग्रामस्थांची स्वतःची मालकीची जागा नसल्यामुळे व शासकीय जागेत गेल्या ३० वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. सदर वसाहतीमधील बांधलेले घरे असून सदर जागा नाबांधवून त्यांना लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा शासकिय निर्णयानुसार ४०० स्क्वे. फुट जागा ही विलंब न लावता लाभार्थ्यांच्या नावावर नियमांनुसार करून देण्यात यावी.अतिक्रमीत जागा नियमांनुसार करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे संदर्भाने पात्र असलेले गरीब, अनाथ, अपंग व होनहार लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित आहेत. करून संबंधीत अतिक्रमीत व राहात असलेल्या पात्र लाभार्थ्यांना अतिक्रमण नियमांनुसार करण्याबाबत प्रा. प. ला शासन निर्णयानुसार प्रस्ताव सादर करून आदेश द्यावेत. व सदर अतिक्रमण नियमांनुसार करूनच पात्र लाभार्थ्यांना तालुक्यात चरण मुक्त घरकुल योजना अंतर्गत इतर योजना अंतर्गत लाभ देण्यात यावा ही विनंती.
तसेच संबंधित प्रकरणाबाबत तातडीने ग्रामपंचायतीच्या संबंधीत लाभार्थ्याचे अतिक्रमण नियमांनुसार करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात यावी.
सदस्यांची संबंधीत जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करावी. कार्यवाही दिनांक १४/८/२०२४ पूर्वी पुर्ण करण्यात यावी. अन्यथा दिनांक १५/८/२०२४ रोजी आम्ही विहीर माच्या महान पुलाजवळ ता. बारशिटाकळी येथे आत्मदहन करणार आहोत.
तसेच निर्माण होणाऱ्या संपूर्ण परिणामांची जबाबदारी आपली व आपले प्रशासनाची व ग्राम पंचायती प्रशासनाची राहील कृपया याची नोंद घ्यावी.
करिता आपल्या माहितीसत्व सविनय सादर.राजकुमार ससाने – शिवसेना उपतालुका प्रमुख प्रा.प. सदस्य महान
जय मधुकर चव्हरे – समाजसेवक
श्रीमती ललिता संतोष तायडे – घरकुल लाभार्थी
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला
मा. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अकोला
मा. उपविभागीय अधिकारी (प्रा.प.), अकोला
मा. तहसीलदार, बारशिटाकळी
मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती बारशिटाकळी
. मा. ठाणेदार पोलीस स्टेशन, बारशिटाकळी सरपंच/ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत विहीर माच्या, ता. बारशिटाकळी, जि. अकोला


