लहुजी शक्ती सेना आग्रही
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद – येथील लहुजी शक्ती सेना व महाराष्ट्र मातंग युवा विकास संघटना यांच्या वतीने, डीजे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशा आशयचे निवेदन उपविभागीय अधिकारी पुसद यांचे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शासनाला देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाचा बहुतांश मुख्य व्यवसाय बँड पथक हा असून डीजे चे प्रमाण वाढल्याने बँड व्यावसायिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कलावंतावर उपासमारीची वेळ आलेली असून बँड व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गांवर असल्यामुळे डीजे मुक्त महाराष्ट्रची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. डीजेमुळे होणाऱ्या दुष्परिणाम टाळण्यासाठी, आजारी लोकांना होणारा त्रास, लहान मुलांना होणारा त्रास टाळण्यासाठी डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना प्रामुख्याने लहुजी शक्ती सेनेचे जिल्हापाध्यक्ष शशांकभाऊ खंदारे, तालुका अध्यक्ष भारत खंदारे, महाराष्ट्र मातंग युवा विकास संघटनेचे अध्यक्ष माणिकराव तायडे, सरचिटणीस नरेंद्र खंदारे, लहुजी शक्ती सेना शहर अध्यक्ष गजानन वंजारे, विजय तायडे, दीपकराव तायडे, रंगराव जोगदंडे, प्रवीण तायडे, सत्यम गायकवाड, श्रीकांत लांडगे, संतोष तायडे, अनिल खडसे, संतोष इंगोले, अमोल गजभार, गजानन बोखारे, राहुल वायदंडे, सोनू घोडेकर, आकाश नेटके हे प्रामुख्याने उपस्थित होते.


