प्रतिनिधि :- इमरान खान सरफराज खान
अकोला:-शिवसेना प्रणित शिव कामगार सेनेच्या अकोला महानगर प्रमुख पदी मनिष रुल्हे यांची नियुक्ती शिवसेना प्रणित शिव कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय रोहणकर यांनी केली.शिवसेना प्रणित शिव कामगार सेना सभासदत्व स्वीकारून कामगार क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली
त्याबद्दल अभिनंदन आपण वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण तसेच मुख्य नेते मा.एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित शिव कामगार सेना कामगार संघटनेचा प्रचार व प्रसार करीत तसेच शिवसेना यांच्या वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे तसेच आपल्या आजपर्यंत केलेले कार्य भविष्यात अजून चांगल्या प्रकारचे कार्य करण्यासाठी शिवसेना प्रणित शिव कामगार सेनाच्या अकोला महानगर प्रमुख मनिष रुल्हे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीमुळे मित्रपरिवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. यावेळी मनीष रुल्हे यांनी आपले श्रेय पक्षातील सर्व ज्येष्ठांना दिले आहे.

