गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
स्मृतीशेष
सोपानदेव मशाखेत्री यांच्या
आठवणीने सारेच गहिवरले
आठवणीतील सोपानदेव
राज्यस्तरीय कविसंमेलन गडचिरोली
येथे उत्साहात संपन्न.
गडचिरोलीचे माजी खासदार
मा.अशोक मारोतराव नेते
यांची लक्षवेधी उपस्थिती.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी डि.बी.ए.अर्थातच डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि) व गडचिरोली जिल्हा कमिटी आयोजित
डि.बी.ए. गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा नागपूर विभागीय अध्यक्ष एक प्रतिभावंत कवी, लेखक, नाटककार, चित्रकार, पत्रकार,पेंटर असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व स्मृतीशेष
सोपानदेव मशाखेत्री यांच्या प्रेरणादायी कार्याला उजाळा देण्यासाठी आयोजित केलेल्या
आठवणीतील सोपानदेव
राज्यस्तरीय कविसंमेलन
रविवार दि.३१ ऑगस्ट २०२५ रोजी
डि.बी.ए.चे
राष्ट्रीय संस्थापक -अध्यक्ष
मा.मनोज जाधव सर यांच्या अध्यक्षतेखाली स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आरसोटी गडचिरोली येथील भव्यदिव्य दालनात संपन्न झाले.
यावेळी सर्व प्रथम महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर स्मृतीशेष सोपानदेव मशाखेत्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
त्यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह
सन्मानपत्र तसेच मानाचा पट्टा देऊन
सत्कार करण्यात आला. पुढे कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दुर्गे यांनी केले तर डि.बी.ए.चे स्फुर्तीगीत
डि.बी.ए.च्या राष्ट्रीय संस्थापिका तथा संपादिका भावना खोब्रागडे यांनी सादर केले.
यानंतर आठवणीतील सोपानदेव राज्यस्तरीय कविसंमेलनासाठी ज्यांची लक्षवेधी उपस्थिती लाभली ते गडचिरोली जिल्ह्याचे माजी खासदार मा.अशोक नेते यांची. यांनी सोपानदेव मशाखेत्री यांच्या आठवणींना उजाळा देत एक प्रतिभावंत निर्भिड पत्रकार हरपल्याची खंत व्यक्त केली. सोपानदेव हे माझे उत्तम मार्गदर्शक होते. अशा भावनिक शब्दात त्यांनी सोपानदेव मशाखेत्री यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यानंतर मंचावरील अनेक मान्यवरांनी सोपानदेव मशाखेत्री यांच्या आठवणींना उजाळा देत
श्रध्दांजली अर्पण केली.
तर अध्यक्षीय भाषणात
मा.मनोज जाधव सर यांनी सोपानदेव मशाखेत्री यांच्या सान्निध्यात व्यथित केलेल्या अनमोल क्षणाला पुन्हा वाचा फोडली. सोपानदेव म्हणजे डि.बी.ए.चा आधारवड….
आदरणीय भावना खोब्रागडे मॅडम यांच्या बरोबरीने सोपानदेव मशाखेत्री यांनी संपूर्ण विदर्भात डि.बी.ए. प्रत्येक जिल्ह्याजिल्ह्यात पोहचवली. वनराईची फुले काव्यसंग्रह प्रकाशित करून सर्वांच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारा हा ध्येयवेडा डि.बी.ए.च्या प्रवाहात एकरूप झाला. अखेरच्या श्वासापर्यंत सोपानदेव मशाखेत्री यांनी सर्व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन कार्य केले. त्याची उणीव आम्हाला सदैव जाणवेल…
अशा भावनिक शब्दात आपल्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप केला.
तर डि.बी.ए.चे नुतन नागपूर विभागीय अध्यक्ष आदरणीय ॲड.डॉ.पि.डी.काटकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
व पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
भोजनाच्या कार्यक्रम नंतर
आठवणीतील सोपानदेव
राज्यस्तरीय कविसंमेलनाला प्रारंभ झाला. सदर कविसंमेलनात जवळपास ३१ कविंनी
सोपानदेव मशाखेत्री यांच्या जीवनावर आधारित आपल्या सदाबहार कविता सादरीकरण केल्या. अनेक कविता ऐकताना अश्रू अनावर झाले. तर सोपानदेव मशाखेत्री यांच्या आठवणींना उजाळा देत सारेजण गहिवरले…..
सदर कार्यक्रमाला सोपानदेव मशाखेत्री यांच्या पत्नी, मुले, मुलगी नातवंडे, त्यांचे बंधू उपस्थित होते.
यावेळी सोपानदेव मशाखेत्री यांची पत्नी व मुलगी यांच्या यशोचित सन्मान करण्यात आला.
आठवणींना उजाळा देण्यासाठी डि.बी.ए.च्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे विदर्भातील पहिले कविसंमेलन ठरले.
तर सहभागी झालेल्या सर्व कविना आकर्षक सोपानदेव
स्मृतीचिन्ह, मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आठवणीतील सोपानदेव या राज्यस्तरीय कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रतिभावंत लोकप्रिय निवेदक डि.बी.ए.चंद्रपूर जिल्ह्याचे
उपाध्यक्ष आदरणीय रवि ताकसांडे यांनी केले.
सदर कार्यक्रमाला डि.बी.ए.भंडारा जिल्हाध्यक्षा उषा घोडेस्वार, गोंदिया जिल्हाध्यक्ष गंगाधर धुवाधपारे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रभाकर दुर्गे, तर उद्घाटक मा.देवनाथ मशाखेत्री, मा.नरेश रामटेके उपस्थित होते.
तर संपूर्ण कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नागपूर विभागीय अध्यक्ष डॉ.ॲड.पि.डी.काटकर, ज्योत्स्ना बनसोड, सुमन चव्हाण, संगीता दुधे, स्वप्निल बांबोळे, संदिप आंबोरकर, प्रेमीला अलोने यांचे विशेष योगदान लाभले.

