बॅक व्यवस्थापकाचा तक्रार अर्ज घेण्यास नकार….
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ :- गणेश राठोड
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये १० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या विड्रॉल (पैसे काढणे) ला स्पष्ट नकार दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेचे अधिकारी ग्राहकांना स्थानिक सीएसपी (ग्राहक सेवा केंद्र) केंद्रावर पाठवत असून, तिथे मात्र प्रत्येक १००० रुपयांवर १० रुपये शुल्क आकारले जात असल्याची तक्रार ओमप्रकाश वसंतराव कृष्णापुरे या स्थानिक नागरिकाने ग्राम सभेत बॅकेच्या मनमानी कारभारा विरोधात ग्राम सभेचा ठराव घेण्याची विनंती अर्जाद्वारे केली आहे.बॅक व्यवस्थापनेच्या मनमानी कारभारामुळे गोरगरीब ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच या तोडगा काढण्यासाठी बँक मॅनेजमेंटने ग्राहकांच्या कमी रकमेच्या विड्रॉल देण्यात यावा या साठी देण्यात येणारा अर्ज स्वीकारण्यास थेट नकार दिला आहे. आणि सीएसपी केंद्रांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणे, या दोन्ही गोष्टी नियमांचे उल्लंघन असल्याचं दिसून येत आहे.ओमप्रकाश कृष्णापुरे यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, “बँकेकडून कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेण्यात यावे असे स्पष्टपणे त्यांच्या सीएसपी सेंटरवर दिसत नाही. ही गोरगरिबांची फसवणूक आहे.”या गंभीर प्रकारावर वेळीच नियंत्रण आणणे आवश्यक आहे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तसेच, सीएसपी केंद्रांवर होणारी लूट थांबवण्यासाठी आणि बँकेमध्ये १० हजार रुपयांपर्यंतच्या विड्रॉलची सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, ग्रामपंचायत यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


