भंडारा विभाग प्रतिनीधी:-(प्रितम कुंभारे)
तालुकास्तरीय कला महोत्सव 2025….
तालुकास्तरीय कला महोत्सव तालुका मोहाडी तर्फे आयोजित पंचायत समिती मोहोडी येथे स्व सुलोचनादेवी पारधी विद्यालय व श्री सुदामा कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथील कु. वैभवी हिरालाल बन्सोड या विद्यार्थिनींनी एकल नृत्य.. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.
नृत्य समूह- शारुण भोंडे, आरुषी उमरकर,निधी हटवार,प्रियांशी बारई यांनी आदिवासी नृत्य मध्ये प्रथम पटकविला तसेच नाटक समूह कु कनक मंगेश शेंडे, सानिया नरेंद्र टिचकुले,मानव शरद मारबते यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

तसेच वादन एकल स्वर मध्ये सतीश कालू डोंगरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, व अंकुर अरुण तितीरमारे यानी पारंपारिक लोकगीत पोवाडा यात तालुक्यातील प्रथम क्रमांक पटकाविला गायन समूह – राजलक्ष्मी क्षीरसागर ऋतुजा शहारे समरीन पठाण मानवी गजभिये यांचा द्वितीय क्रमांक, दृश्यकला एकल चित्रकला हर्षदा मारबते तृतीय क्रमांक, दृश्यकला एकल मूर्तिकार क्षितिज जीजूटे तृतीय क्रमांक पटकाविला.

या सर्व विद्यार्थ्यांचे श्री कुकडकर सर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मोहाडी श्री ओ.बी गायधने सर श्री प्रशांत बोरघरे सर,कु. शारदा चौधरी मॅडम, कु. विना शेंडे मॅडम व पंचायत समिती मोहाडी येथील संपूर्ण टीम यांनी विजेत्यांचे अभिनंदन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

