युसुफ पठाण:- वर्धा विभाग प्रतिनिधी
मुस्लिम धर्मामध्ये पवित्र असलेल्या हज यात्रा हा एक अविस्मरणीय क्षण असतो. हज यात्रेसाठी दिनांक 17 ऑगस्ट रोजी वर्धा येथील कामगार नेते नजीरभाई शेख हे सहपरिवार हज यात्रेमध्ये रवाना झाले होते. एकूण 17 दिवसाची हजयात्रा त्यांनी सुखरूपपणे पार पाडली. यामध्ये त्यांनी आपल्या परिवारासह मदिना, मक्का या पवित्र स्थळासह अनेक यात्रा ठिकाणी दर्शन घेतले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रईसा शेख, मुलगा नाझीम शेख हे परिवारासह हज यात्रेत सहभागी झाले होते.
हज यात्रा ही नशिबानेच होते असे अनेक मुस्लिम बांधवांचे म्हणणे आहे. यामध्ये नजीर भाई शेख हे आपल्या परिवारासह हज यात्रेत गेले हा त्यांच्या जीवनातील एक मोठा क्षण असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
दिनांक 3 सप्टेंबर रोजी हज यात्रेवरून परतल्यानंतर त्यांचे वर्धा रेल्वे स्टेशनवर त्यांच्या चाहत्यांनी जंगी स्वागत केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कांबळे, नितीन सुळे, नारायण जारुंडे, केशवराव शंभरकर, प्रल्हाद गोटे, कमलाकर वाघमारे, उमेश कांबळे, सत्यपाल वैद्य ,राजू थुल, सुनील बनकर, विजय म्हैसकर , इरशाद अली, असलम शेख, राजू पठाण यांच्यासह अन्य त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.



