स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग नागपूर व रेल्वे पोलीस वर्धा ची संयुक्त कारवाई
वर्धा :-युसुफ पठाण ( महाक्रांती न्यूज नेटवर्क)
दि. २९/०८/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग नागपूर यांनी आरोपी नामे. तुळशीदास दामोदर राठोड, वय ३५ वर्षे, धंदा मजुरी, राह. गडचांदूर, ता. कोरपणा, जिल्हा – चंद्रपूर (महाराष्ट्र) याचे कडे चोरीचे ०४ मोबाईल, किंमत अंदाजे ९०,०००/रू. मिळून आल्याने, त्यास रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे पुढील कार्यवाही कामी आणून हजर केले होते. सदर आरोपी हा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यास रे. पो. स्टे वर्धा येथील अप क्रमांक ३२/२०२५ कलम ३०५ (क) भारतीय न्याय संहिता (BNS) मध्ये अटक करून, मा. कोर्टासमोर हजर केले असता, मा. कोर्टाने त्याचा दि.२९/०८/२०२५ ते दि.०२/०९/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड (PCR) मंजूर केल्याने, गुप्त बातमीदारा द्वारे मिळालेल्या माहितीवरून व तांत्रिक पद्धतीने तपास करून, PCR दरम्यान सदर आरोपीकडून आणखी ०९ मोबाईल (पॅटर्न लॉक असलेले) अंदाजे १,९०,०००/- रू. किंमतीचे हस्तगत करण्यात आले असून, एकूण १३ मोबाईल अंदाजे २,८०,०००/- रू. किंमतीचे त्याचेकडून हस्तगत करण्यात आले आहे. तसेच सदर आरोपीच्या PCR ची मुद्दत आज दि. ०२/०९/२०२५ रोजी संपत असल्याने, आरोपीस मा. कोर्टात हजर करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर श्री मंगेश शिंदे सो., मा. अप्पर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर डॉ. श्री दत्ताराम राठोड सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग अकोला विभाग मा. श्री पांडुरंग सोनवणे सो. यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखा, प्रभारी अधिकारी श्री पंजाबराव डोळे, रेपोस्टे वर्धा प्रभारी अधिकारी पंकज ढोके यांनी स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर येथील पोलीस हवालदार महेंद्र मानकर, पोलीस नाईक नितीन शेंडे व रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कांबळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार संतोष वडगिरे, पोलीस शिपाई चंदन डेहनकर, पंकज भांगे, संदेश लोणारे, गोपनीय शाखेचे पोलीस शिपाई दिनेश भावे यांनी केली आहे.


