गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
अहेरी तालुक्यातील मौजा – कोरेपल्ली गावाचा वन हक्क समिती आणि गावकऱ्यांनी कोरेपल्ली गावाजवळील सिरोंचा डिविजन बोंड्री बनविण्यासंदर्भात निवेदन हे वन परिक्षेत्र अधिकारी कमलापुर यांच्या मार्फत सिरोंचा चे उप वनसंरक्षक यांना निवेदन देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, वन विभाग सिरोंचा, वन परिक्षेत्र कार्यालय कमलापुर अंतर्गत येणारा कोरेपल्ली गावाचा हद्दीतील जंगल हे सिरोंचा वन विभागात येतो. परंतु सन – २०२४ मध्ये कोरेपल्ली गावाचा हद्दीतील एक कंपार्टमेंट चा जंगलातून वन विभाग आलापल्ली कडून लाट्टे व बिट कापणी केलेला आहे. तसेच सदर लाट्टे आणि बिट कापणी केलेला कंपार्टमेंट चा जंगलात यापुर्वी वन विभाग सिरोंचा आणि वन परिक्षेत्र कमलापुर तर्फे वन विभागाचा विविध कामे केलेला आहेत.
म्हणुन कोरेपल्ली गावाचा हद्दीतील जंगलाला लागुन असलेला वन विभाग सिरोंचा चा डिविजन बोंड्रीवरील झाडे तोडून, डिविजन बोंड्री तयार करावे, तसेच सदर बोंड्रीवर, बोंड्री खांबे लावावे.
जेणेकरून सदर जंगलाला लागुन असलेले इतर गावातील लोक त्या जंगलावर कब्जा करू नये असे निवेदनात म्हटले आहे.
. यावेळी निवेदन कमलापुरचे वन परिक्षेत्र अधिकारी जी. जी. गडमाडे यांनी यांनी स्वीकारले.
यावेळी निवेदन देतांना – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव – बालाजी गावडे, कोरेपल्लीचे वन हक्क समिती अध्यक्ष – रामा गावडे, सचिव – रैनु गावडे, कोरेपल्ली गावाचे पाटील – दामा गावडे, मंगेश कुळमेथे, बालाजी कुळमेथे, बिच्यु गावडे, मादी कुळमेथे, संभा गावडे, उंगा वेलादी, शंकर कुळमेथे, बंडू कुळमेथे, झूरु आत्राम सह कोरेपल्ली गावातील नागरीक उपस्थित होते.



