अकोला विभाग प्रतिनिधी :- गणेश वाडेकर
अकोला – महालक्ष्मी देवीची स्थापना गुजरात च्या धरतीवर गुजराती सजावट करून मयुरी रितेश मालगे, यांनी केली मांलगे परिवाराच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी महालक्ष्मी मातेची संपूर्ण सजावट गुजराती पॅटर्नच्या देखावा करून करण्यात आला.
यावेळी सौ.मयुरी मालगे,सौ.शारदा मालगे, सो छाया मालगे,सौ. स्वाती सचिनराव निळे ,सौ.सविता वानखडे,सौ शितल मालगे यांनी संपूर्ण देखरेखीखाली सजावट केली यावेळी महालक्ष्मी मातेचे पूजन अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित जी चांडक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वागत रितेश मालगे , सचिन निळे,अनिल मालगे, गजानन मालगे , आशिष मालगे संतोष मालगे,आदींनी केले यावेळी महालक्ष्मी मातेच्या देखाव्याची चर्चा संपूर्ण परिसरामध्ये होती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमा शुभेच्छा दिल्या.


