सदाभाऊ खोत यांचे मातृप्रेम….
ऊन, वारा, पावसात शेतात घाम गाळून, काबाडकष्ट करून आम्हाला उभं करणारी ती माऊली…मोठ्या संघर्षातून संसाराचा डोलारा सांभाळणारी तीची ताकद आता वयोमानामुळे थकली आहे. ज्या हातांनी मला लहानपणी प्रेमाने घास भरवला, त्या हातांना आज मी घास भरवतोय…ज्या मायेच्या सावलीत मी वाढलो, त्या मायेची सेवा करण्याची वेळ आज माझ्या वाट्याला आली आहे.
आईची सेवा करणं म्हणजे आयुष्याचं खरं समाधान आहे…तिच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आशीर्वादात माझं आयुष्य दडलं आहे.


