युसूफ पठाण:- प्रतिनिधी
बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही तरुण कंत्राटी पद्धतीने कामावर होते. साई मल्टी सर्व्हिसेस कंपनीने कंत्राट संपल्यानंतर 40 हून अधिक जणांना कामावरून कमी केले आणि त्यांच्या कष्टाचे ६ महिन्यांचे (प्रत्येकी सुमारे 72,000 रुपये) वेतन थकवले होते.
या अन्यायाविरोधात त्या तरुणांनी आवाज उठवला तेव्हा राजकीय नेत्यांचे दलाल बनलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांचे हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे बुडवण्याच्या तयारीतच प्रशासन आणि कंपनी होती.
सर्व तरुणांनी माझ्या कार्यालयात येऊन आपली आपबीती सांगितली. त्यांची वेदना पाहून मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. जिल्हा शल्यचिकित्सक आणि कंपनीला जरा आपल्या पद्धतीने फैलावर घेतले आणि ठाम भूमिका दाखवली. मग प्रशासन व कंपनी ताळ्यावर आली…
फक्त आठ दिवसांतच त्या 40 तरुणांच्या खात्यात 32 ते 35 लाख रुपयांची रक्कम जमा झाली. ‘क्रांतिकारी’च्या दणक्यामुळे अखेर त्या तरुणांना न्याय मिळाला!
हक्काचे पैसे मिळाल्यानंतर हे तरुण माझ्या कार्यालयात सत्कार करण्यासाठी आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला मनापासून समाधान मिळाले आणि लढण्यासाठी नव्याने ऊर्जा मिळाली.



