कंधार प्रतिनीधी: -ज्ञानेश्वर कागणे
अनुराधा चेतन केंद्रे माजी नगराध्यक्षा कंधार या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विषयात MH-SET (सेट परीक्षा २०२५ )उत्तीर्ण झाल्या आहेत. यापूर्वीही त्या इंग्रजी विषयात ऑगस्ट २०२४ मध्ये MH- SET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत.तसेच त्या डबल एम. ए .(इंग्रजी व मराठी) पास असून त्या डी.एड ,बी.एड, एम .एड . व स्कूल मॅनेजमेंट कोर्स प्रथम श्रेणीत पास आहेत .
या यशाबद्दल त्यांचे कंधार लोहा तालुक्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.तसेच कंधार पंचायत समिती चे माजी उपसभापती संभाजी पाटील केंद्रे,प्रवीण पाटील चिखलीकर,प्रणिताताई देवरे चिखलीकर, सासरे प्रा.दौलत नागोबा केंद्रे अध्यक्ष संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार ,सचिव चेतन केंद्रे ,महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज शेकापूर चे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे ,तुकाराम गीते माजी कृषी अधिकारी परळी, जनार्दन केंद्रे ,मुख्याध्यापक महात्मा फुले माध्यमिक विद्यालय कंधार , महात्मा फुले प्राथमिक शाळा मुख्याध्यापक वाघमारे डी जी तसेच संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा मुख्याध्यापक धोंडीबा नागरगोजे, माधव केंद्रे आरएफओ नांदेड या सर्वांनी अभिनंदन केले आहे .

