सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
दिनांक 31- 8 -2025 रविवारला सनातन धम्म चे पहिले महाराष्ट्र राज्य अधिवेशन पुसदच्या संभाजीनगर येथील , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनांमध्ये पार पडले या अधिवेशनासाठी भंते कमलधम्मो पुसद, भन्ते महाकाश्यप मानोरा , भन्ते पट्टिशन हिंगोली , भन्ते आनंद मुंबई ,आदी बौद्ध भिक्खू उपस्थित राहून त्यांनी बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या संबंधाने धम्मदेशना केली .
तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय अविनाश गेडे – (कोमाकी इलेक्ट्रिक गाड्यांचे शोरूम ) माननीय गौतम नगराळे (सेवानिवृत्त उपआयुक्त चंद्रपूर ) माननीय राजेंद्र नाईक (सेवानिवृत्त पीएसआय तथा जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पुसद ) ,माननीय एडवोकेट पद्माकर विघ्ने , आदी मान्यवर विशेष उपस्थितीमध्ये उपस्थित राहून त्यांनी समाजास येणाऱ्या काळातील आव्हानांच्या संबंधाने मार्गदर्शन केले. या अधिवेशनाचे उद्घाटक माननीय बाबुरावजी कसबे – ( यूवा उद्योजक नांदेड ) हे होते . त्यांनी या अधिवेशनामध्ये युवकांना व्यवसायाच्या संबंधाने व बौद्ध धम्म तथा महापुरुषांची विचारधारा अंगीकार करून समाजाने आपला विकास घडवून आणावा यासंबंधीचे उद्घाटनपर विचार मांडत असताना त्यांनी या अधिवेशनाची अधिवेशनाचे उद्घाटन केले .तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय सम्राट दादा कोकणे, चिंचोली यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्य केले .

प्रमुख वक्ते म्हणून माननीय कोमलराव उत्तर प्रदेश -सारनाथ यांनी या परिषदेमध्ये विद्यमान व्यवस्था ही बहुजनांच्या हक्क अधिकाराच्या विरोधात कार्य करत असल्याचे विशद केले . महाबोधी महाविहार बौद्ध लोकांनी शक्ती निर्माण करून मुक्त केले पाहीजे अशा प्रकारे विचार विशद केले . तसेच माननीय प्रोफेसर अमोल सोनवणे अमोल सोनवणे मुंबई यांनी या अधिवेशनामध्ये समाज बांधवांना बौद्धविरा सतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक होऊन या विरासतीच संवर्धन केलं पाहिजे जतन केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.

या अधिवेशनाची अध्यक्षता माननीय डॉक्टर विलास खरात – ( राष्ट्रीय अध्यक्ष सनातन धम्म आणि प्रबुद्ध भारत नवी दिल्ली )यांनी महापुरुषांच्या त्यागाचा इतिहास कथन केला . त्यांनी समाजामध्ये वैचारिक दृष्टिकोन दिला त्यामुळे महामानवांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करून समाजाचे हित साधले जाऊ शकते. या दृष्टिकोनातून महापुरुषांची खरी विचारधारा समाजात मांडण्याची गरज आहे . अशा प्रकारचे मत विशद केले . प्रास्ताविक डी . एन . कोकणे यांनी केले . तर सुत्रसंचालन पी . आर खंदारे यांनी केले . कार्यक्रमाची सांगता सरणंय गाथेनी करण्यात आली . आभार ॲड पद्माकर विघ्ने यांनी व्यक्त केले .


