मनसेकडून देण्यात आले निवेदन शहापूर पोलीस स्टेशनला…
खर्डी प्रतिनिधी:- सगीर शेख
शहापूर शहरातील पटेल किराणा मधील काही कामगारांनी आज सकाळी आसनगाव येथील मराठी रिक्षा चालक ह्यांना काही किरकोळ कारणावरून मारहाण केली . एका मराठी माणसावर झालेल्या मारहाण संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहापूर पोलीस स्टेशन चे निरीक्षक श्री ढगे साहेब ह्यांना निवेदन दिले .
सदर निवेदनात आज झालेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला व सदर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी तसेच शहापूर मधील सर्व दुकानांमधील परप्रांतीय कामगारांची माहिती पोलीस स्टेशन ला लवकरात लवकर जमा करावी अश्या संदर्भात निवेदन दिले .

ह्या वेळी ठाणे जिल्हा सचिव राकेशजी वारघडे साहेब ,विद्यार्थी सेना तालुक़ा अध्यक्ष विक्रांत जी मांझे साहेब,कौस्तुभजी लीमये , हर्षचन्द्र खंडवीसाहेब,शशि पुरभे ,शहर अध्यक्ष विनोद पाठारी,उपशहर अध्यक्ष किशोर गरुड़कर, उपशहर अध्यक्ष सोमनाथ शिंदे इत्यादि उपस्थित होते…


