अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
पुस्तकाचे थाटात प्रकाशन….
अकोला – शरदचंद्र पवार साहेब आणि आंबेडकरी नेत्याचं राजकीय धोरण ! या रामकृष्ण गोपनारायण द्वारा लिखीत पुस्तकाचे दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता स्थानिक विश्रामगृह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे श्यामबाबू अवस्थी, प्रमुख उपस्थितीमध्ये महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मो. रफिक सिद्दिकी, कार्याध्यक्ष युसुफ अली, प्रा. संतोष हुशे सर, चंदु सावजी, दिगंबर वाकोडे आदींसह कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी आपले मत मांडले व शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबतच्या आठवणी व अनुभव सांगितले. पुस्तकाचे लेखकाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अमूल्य कार्याची दखल घेत त्यांच्या आंबेडकरी विचार घेऊन भारतातील मोठा राष्ट्रीय पक्ष चालवणे व त्यांचे महाराष्ट्राचे विकासात व राजकारणामध्ये असलेले अमूल्य योगदानाचे सुंदर वर्णन केले.
यावेळी महानगर उपाध्यक्ष पापाचंद्र पवार, पप्पु खान संघटक सचिव,अल्पसंख्यांक सेल महानगर अध्यक्ष वसिम खान, माजी संघटक सचिव शेख रमजान ,अपंग सेलचे मो. सालार ठेकेदार, बाबासाहेब घुमरे, पूर्व ब्लॉक अध्यक्ष काशिनाथ बागडे, आनंद वैराले, शाहीद सिद्दीकी, उमेश खंडारे, भाऊराव साबळे, उमेश वानखडे, नरेंद्र देशमुख, महानगर प्रसिद्धी प्रमुख अमन घरडे, अशोक रामटेके, धुमाल आयवळे, भारत सत्याल, मनोज सत्याल आदी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विनय ओवाल यांनी तर आभार प्रदर्शन सचिन आयवले यांनी केले.

